ओम नमो नारायण !
दशनाम गोसावी समाजात मृत्यूनंतर , तिसऱ्या दिवशी आणि तेरावा - भंडारा करताना पूजा केली जाते. हा पूजा विधी महाराष्ट्रात सगळीकडे सारखाच नाही. तसेच असाही अनुभव आला आहे की अनेक ठिकाणी पूजाविधी माहित नाही किंवा पुजारी नाही म्हणून तो केला देखील जात नाही.
या त्रुटी होऊ नयेत आणि आपल्या समाजाचा हा पारंपारिक वारसा नवीन पिढीला माहित व्हावा म्हणून केलेला हा एक प्रयत्न आहे.
सनातन समाधी विधी हा नवनाथ साहित्यात आढळून येतो. त्यांच्या धरतीवर योगी / गोसावी यांचे हे विधी कसे असावेत हे अभ्यासपूर्वक यात दिलेले आहे.
- श्री. सुरेश भारती
(M.A.B.Ed.)